किम कदार्शिया देसी गर्लच्या सौंदर्यासमोर ‘पानी कम चाय’

priyanka-chopra
विविध कारणांसाठी कायमच बॉलिवूड अभिनेत्री चर्चेत राहत असतात. अशाच दोन अभिनेत्रींची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन या अभिनेत्री असून त्यांचा एक फोटो सध्या दोघींच्या चर्चेसोबतच व्हायरल होत आहे.

या दोघी न्युयॉर्कमध्ये नुकत्याच नों टिफनी अॅण्ड कोजच्या ब्लू बूक कलेक्शनच्या एका कार्यक्रमामध्ये एकत्र दिसून आल्या. या दोन्ही अभिनेत्री यावेळी प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त अंदाजामध्ये दिसून येत होत्या. विशेष म्हणजे या दोघींचाही वावर पाहता या गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या चांगल्या मैत्रीण असल्याचा भास होत होता.

View this post on Instagram

Priyanka and Kim #priyankachopra

A post shared by Priyanka Chopra Network (@priyankanetwork) on


सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमातील प्रियंका-किमचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत असून या दोन्ही अभिनेत्रींनी यामध्ये एक खास पोझ दिली आहे. प्रियंकाने यावेळी पेस्टल रंगाचा बॅकलेस सिक्वेंस ड्रेस परिधान केला होता. तर पांढऱ्या रंगाचा ड्रेस किमने घातला होता. तिने त्यासोबतच सिल्वर रंगाचे दागिनेही घातले होते. प्रियंकाने यावेळी केलेल्या गेटअपमुळे किमपेक्षा ती जास्त उठून दिसत आहे. दरम्यान, हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी या कार्यक्रमामध्ये प्रियंकासोबत उपस्थित होते.