सॅन फ्रान्सिस्को – सोशल मीडियावर कुठेही सर्फ करताना आपल्याला असंख्य जाहिराती दिसत असतात. पण यापुढे आता तुम्हाला व्हॉट्सअॅपवरही जाहिराती दिसण्याची शक्यता असल्यामुळे जाहिराती आता तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर दिसू लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. कारण वापरकर्त्यांच्या स्टेट्सवर या जाहिराती येणार असल्याचे माध्यमातील वृत्तात म्हटले आहे.
आता तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवरही दिसणार जाहिराती ?
वापरकर्त्याला व्हॉट्सअॅपच्या स्टेट्स या फीचर्समध्ये शब्द, फोटो, व्हिडिओ आणि अॅनिमेटेड जीआएफ शेअर करता येतात. हा स्टेटस २४ तासानंतर पुन्हा दिसत नाही. याच माध्यमातून व्हॉट्सअॅप जाहिराती दाखवून पैसे कमविण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅप बीटाच्या व्हर्जन २.१८.३०५ मध्ये स्टेट्सवर अॅड दिसणार असल्याचे WABetaInfo च्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हे फीचर्स सध्या वापरकर्त्याला दिसू शकत नाहीत.
याबाबत माध्यमातील वृत्तानुसार फेसबुकच्या जाहिरात व्यवस्थेकडून या जाहिराती दाखविल्या जाणार आहेत. व्हॉट्सअॅप कंपनीने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हॉट्सअॅपचा वापर करुन पैसे कमवण्याचा उद्देश फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने ठेवल्याने व्हॉट्सअॅपच्या सहसंस्थापकांनी राजीनामा दिला होता. यापैकी ब्रायन अॅक्टन यांनी नुकताच झुकेरबर्गला मेसेजिंग अॅपद्वारे पैसे कमवण्याची घाई होती, असे म्हटले होते. जाहिरातींचे ध्येय निश्चित केल्याने मी दु:खी झाल्याचेही अॅक्टन याने म्हटले होते.
फेसबुकने ४ वर्षापूर्वी १९०० कोटी डॉलर्सला व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप विकत घेतले आहे. जगभरात फेसबुकचे १५० कोटी वापरकर्ते आहेत. तर, व्हॉट्सअॅपचे २३० कोटी वापरकर्ते आहेत.