चीनमध्ये अॅपलला अब्जावधी डॉलरचा फटका

iphone
सॅन फ्रान्सिस्को – अॅपलला चीनमध्ये फोन दुरुस्तीसाठी बेकायदेशीररीत्या दावा केल्यामुळे अब्जावधी डॉलरचा फटका बसला आहे. गेल्या ५ वर्षांपासून हा घोटाळा सुरू असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. संघटित गटांकडून अतिशय नियोजनबद्धरीत्या आयफोनची चोरी अथवा खरेदी केली जात होती. यामधील सीपीयू, स्क्रीन, लॉजिक बोर्ड हे काढून बनावट पार्ट बसविले जात होते. विशेष म्हणजे अॅपलचेच माजी कर्मचारी असलेले ६ जण यामध्ये सहभागी होते. त्यानंतर हे चोर अॅपल स्टोअरमध्ये जाऊन त्यांचे आयफोन फुटल्याचे सांगत परत करत होते. आयफोन कंपनीकडून बदलून मिळाल्यानंतर यामधील महागड्या पार्टची पुन्हा विक्री करत होते.

अॅपलने वॉरंटी म्हणून दुरुस्त करुन दिलेल्या मोबाईलपैकी ६० टक्के हे फसवणुकीच्या प्रकारामधील होते. २०१३ या आर्थिक वर्षात आयफोनच्या वॉरंटीमुळे अॅपलला १.६ बिलियन डॉलरला फटका बसला. पण आयफोनने फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच वॉरंटीवर अधिक पैसे खर्च करणे थांबविले. तसेच फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी अॅपलने आयफोन दुरुस्त करण्याबाबत कडक नियम बनविल्यामुळे फसवणुकीचे प्रकार ६० टक्क्यावरुन २० टक्क्यावर आले आहेत. असेच फसवणुकीचे प्रकार तुर्की आणि सौदी अरब या देशांमध्ये होत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment