रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर

indian-railway
नवी दिल्ली – अनेकजण दिवाळी सणासाठी बोनसची वाट पाहतात. पण रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच केंद्रीय मंत्रिमंडळाने बोनस जाहीर करुन भेट दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने नवरात्र सणाच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर केला आहे.

रेल्वेच्या सुमारे ११.९१ लाख कर्मचाऱ्यांना बोनसचा फायदा होणार आहे. रेल्वेकडून या बोनससाठी कर्मचाऱ्यांना एकूण २ हजार ४४ कोटी ३१ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. रेल्वे पोलीस दल, रेल्वे विशेष पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार नाही. या बोनसला प्रॉडक्ड लिंक्ड बोनस (पीएलबी) म्हटले जाते. रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जातो.

Leave a Comment