बिग बींच्या वाढदिवसानिमित्ताने आगामी चित्रपटाचा फर्स्ट मोशन टीझर रिलीज

amitabh-bacchan
आज बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ७६ वा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट मोशन टीझर रिलीज करण्यात आला आहे. बिग बींचा अनोखा लूक यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे.


‘स्येरा नरसिंहा रेड्डी’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून हा एक तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण करणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच नयनतारा, विजय सेतुपती, तमन्ना आणि सुदीप असे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेंद्र सेतुपती करत आहे.