अमिताभ बच्चन यांच्याविषयी मेकअपमॅनने केले कौतुकास्पद खुलासे

ab
अमिताभ बच्चन हे बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जातात. वयाची पंच्याहत्तरी उलटून गेल्यानंतर देखील अमिताभ आजही चित्रपटांमध्ये भूमिका करीत आहेत, इतकेच नव्हे, तर त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या इतर नामांकित कलाकारांसाठी वरचढही ठरत आहेत. अलीकडेच अमिताभ बच्चन यांचे मेकअपमॅन दिलीप सावंत यांनी अमिताभ यांच्याबद्दल काही खास गोष्टींचा खुलासा केला. या गोष्टी जाणून घेऊन आपल्याला आश्चर्य वाटेलच, पण त्याचबरोबर या महानायकाचे कौतुक वाटल्या खेरीजही राहणार नाही.
ab1
दिलीप सावंत आणि अमिताभ बच्चन यांचा सहवास ‘जंजीर’ चित्रपटा पासून आहे. तेव्हापासून आज तागायत अमिताभ यांचे मेकअपमॅन म्हणून कार्यरत असणाऱ्या दिलीप सावंत यांनी अमिताभचे यश आणि अपयश दोन्ही अगदी जवळून पाहिले आहे. अमिताभ यांनी दिलीप सावंत यांना नेहमी अतिशय सन्मानाची वागणूक दिल्याचे सावंत म्हणतात, तर त्यांचा ऑन-स्क्रीन लूक खास बनविणारी व्यक्ती त्यांच्यासाठी खासच असल्याचे अमिताभ म्हणतात. अमिताभ बच्चन वेळेचे पाबंद असून, सर्व कामे वक्तशीरपणे झालेली त्यांना आवडतात. वेळेच्या बाबतीत अमिताभ किती चोखंदळ आहेत हे सर्वांनाच ठाऊक असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांमध्ये देखील ही शिस्त आपोपाप येत असल्याचे सावंत सांगतात.
ab2
अमिताभ काम करीत असलेल्या चित्रपटातील युनिटमधील सर्वच जण चित्रीकरणाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचतातच असे नाही. आपण अमिताभ चित्रीकरणाच्या ठरलेल्या वेळेअगोदर अर्धा तास सेटवर हजर असतात. अश्या वेळी केवळ बसून न राहता अमिताभ सेटवरील झाडांना पाणी घालतात, तर कधी सेट वर स्वच्छता करण्यास ही हातभार लावतात. बॉलीवूडचा महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याची राहणी अतिशय साधी असल्याचे सावंत म्हणतात.
ab3
अमिताभ स्वतःच्या कामाच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असून, इतरांनीही तसेच असावे अशी त्यांची अपेक्षा असते. अगदी बारीक सारीक गोष्टींकडे देखील अमिताभ यांचे लक्ष असते, तरीही इतरांच्या कामांमध्ये अमिताभ कधीही ढवळाढवळ करीत नाहीत. अमिताभ यांना आजवर कधीही रागावलेले, किंवा कोणावर ओरडताना आपण कधीही पाहिले नसल्याचे सावंत म्हणतात.