कॉल व मेसेजशी अॅप्सचा अॅक्सेस गुगलने केला बंद

google
नवी दिल्ली – गुगलने युजर्सचा डेटा लीक होत असल्याच्या प्रकरणावर मार्ग काढण्यासाठी युजर्सचे कॉल आणि मेसेजशी मोबाइल अॅप्सचा असलेला अॅक्सेस बंद केला आहे. आर्थिक क्षेत्रात सेवा देणाऱ्या कंपन्यांसह ई-कॉमर्स कंपन्यांवर याचा सर्वात मोठा परिणाम होणार आहे. यामुळे पेटीएमसारखे अॅप मोबाइल युजरचे कॉल आणि मेसेजपर्यंत पोहचू शकणार नाही.

मोबाइल युजरने दिलेल्या माहितीच्या आधारे या कंपन्या युजरचे क्रेडिट प्रोफाइल तयार करत होत्या. ग्राहकाच्या आवडीनिवडी यातून कळू शकत होत्या. तज्ज्ञांनुसार, हा निर्णय गुगलने काटेकोरपणे राबवला तर पेटीएम आणि फ्लिपकार्टसारख्या छोट्या स्टार्टअपच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या निर्णयामुळे आता युजर जेवढी परवानगी देईल तेवढाच अॅक्सेस कंपन्यांना मिळेल. युजरने पूर्वी परवानगी दिल्याशिवाय अॅप सुरू करता येत नव्हते. दरम्यान, ज्या कंपन्या याच डेटावर विसंबून आहेत त्यांना यातून सूट मिळू शकते.

Leave a Comment