मोबाईलवरूनही बजावता येणार मतदानाचा हक्क

voting
आजच्या घडीला प्रत्येक कामासाठी मोबाईलचा वापर वाढत चालला असतानाचा आता अमेरिकेच्या पश्चिम व्हर्जिनिया राज्यात नोव्हेंबर मध्ये होत असलेल्या मध्यावधी निवडणुकात मोबाईलवरून मतदान करू दिले जाणार आहे. मोबाईलवरून पैसे देवाणघेवाण, फेस टू फेस गप्पा, निरोपाची देवाणघेवाण, बिल भाराने, बँक कामे करणे आता बहुतेकांच्या अंगवळणी पडले आहे. त्यात आता मतदानाची भर पडणार आहे.

मोबाईलवरून मतदान करण्याच्या तंत्राचा वापर यापूर्वी ट्रायल रन्स, रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम अश्या खासगी निवडणुकात केला गेला आहे. मात्र सार्वत्रिक निवडणुकांत हे तंत्र प्रथमच वापरले जाणार आहे. व्हर्जिनिया राज्याचे सचिव म्हणाले या आधुनिक सुविधेचा लाभ आमच्या राज्याचे जे नागरिक दुसरया गावात अथवा देशात आहेत त्यांना त्याचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घेता येणार आहे.

या निर्णयाविरोधात काही तज्ञांनी विरोधी मत नोंदविताना हि पद्धत धोकादायक ठरू शकेल अशी भीती व्यक्त केली आहे तर काही तज्ञांनी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत रशियन हॅकर्सचा हस्तक्षेप झाला होता याकडे नजर वेधली आहे. मोबाईल मतदानाठी असे प्रकार घडू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र राज्य सचिव मॅक वॉरनर आणि मोबाईल मतदानासाठी व्होत्झ हे अॅप बनविणारी बोस्टनची कंपनी यांनी ही प्रणाली अतिशय सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

Leave a Comment