मजुराला सापडला अडीच कोटी किमतीचा मोठा हिरा

panna
मध्यप्रदेशात हिरयांसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना पासून ८ किमीवर असलेल्या पटी या गावात खोदकाम करताना मोतीलाल प्रजापती या मजुराला पन्नाच्या इतिहासातील दोन नंबरचा हिरा सापडला आहे. हा हिरा ४२.५९ कॅरेट वजनाचा असून त्याची किंमत दीड ते अडीच कोटी रुपयांदरम्यान आहे असे समजते. हिरा मिळाल्यावर नियमानुसार मोतीलाल यांनी तो सरकारी खजिन्यात जमा केला आहे.

या हिऱ्याचा लिलाव केला जाईल आणि त्यातून १३.५ टक्के रॉयल्टी कापून बाकी रक्कम मोतीलाल यांना दिली जाईल असे समजते. पन्ना जवळच्या पटी येथे मोतीलाल हिरे खाण चालवितो. गेले दीड महिना ते येथे खोदकाम करत होते. मंगळवारी त्यांना हा हिरा मिळाला. पन्ना खाणीतून मिळालेला हा दुसरा मोठा हिरा असून यापूर्वी १९६१ मध्ये रसूल मोहम्मद यांना ४४.५५ कॅरेटचा हिरा मिळाला होता. मोतीलाल या हिऱ्यातून जे पैसे मिळतील त्यातून आईवडिलांची सेवा आणि मुलांचे शिक्षण याचा खर्च करणार आहेत. ते म्हणाले वडील नेहमी म्हणत कि मजुरी करून आयुष्य बदलत नाही म्हणून मी हिरे खोदकाम सुरु केले होते.

Leave a Comment