पॅनासोनिक इलुगा ६०० बजेट स्मार्टफोन लाँच

eluga600
पॅनासोनिकने त्यांचा बिग व्ह्यू डिस्प्ले सिरीज मधील नवा बजेट स्मार्टफोन इलुगा ६०० सादर केला असून तो ११ ऑक्टोबर पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे. या फोनची किंमत ७९९९ रुपये आहे.

या फोनला ५.९९ इंची एचडी आयपीएस डिस्प्ले दिला गेला आहे. ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज ते मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. १३ एमपीचा ऑटो फोकस रिअर कॅमेरा असून फ्लॅश सह ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनला ४००० एएमएच बॅटरी असून अँड्राईड ८.१.० ओएस आहे. कमी किमतीत चांगले फीचर्स असलेला हा फोन भारतीय ग्राहकांची पसंती मिळवेल असा विश्वास पॅनासोनिक इंडियाचे वरिष्ठ अधिकारी अय्यपन राजगोपाल यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment