मुख्यमंत्र्यांच्या भेटीला उदयनराजे भोसले

combo1
सातारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले मुंबईला रवाना झाले असून उदयनराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. उदयनराजे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट मतदारसंघातील कामांसाठी घेत असल्याचे उदयनराजेंनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणी एक महत्त्वाची बैठक झाली. अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबद्दलची चर्चा झाली. साताऱ्यातील आमदार आणि नेत्यांनी त्या बैठकीत उदयनराजे यांना आपला विरोध असल्याची भूमिका घेतली. यानंतर उदयनराजे आणि शरद पवार यांच्यातही चर्चा झाली. पण शरद पवारांनी उदयनराजेंना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्यामुळेच इतर पक्षातही आपले मित्र असल्याचे सूचक विधान उदयनराजेंनी पत्रकारांशी बोलताना केले होते. या पार्श्वभूमीवर उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी साताऱ्याहून रवाना झाले होते. त्यामुळे या भेटीत काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment