भारताच्या आर्थिक प्रगतीत वाढ, आणखी वेगाने होणार विकास – जागतिक बँक

world-bank
भारताच्या आर्थिक प्रगतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून देशाचा आणखी वेगाने विकास होणार आहे, असे भाकित जागतिक बँकेने व्यक्त केले आहे. येत्या आर्थिक वर्षात ही वाढ 7.3 टक्के राहील, असा अंदाज असून त्यानंतर पुढील दोन वर्षांत तो वाढून 7.5 टक्क्यांवर जाईल, असे बँकेने म्हटले आहे.

जागतिक बँकेने आपल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) अशा तात्पुरत्या अडथळ्यांवर मात करून भारताची अर्थव्यवस्था बाहेर पडली आहे. मात्र देशांतर्गत जोखिम आणि देशाबाहेरील प्रतिकूल वातावरण यांमुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो, अशा इशाराही त्यात देण्यात आला आहे.

“जीएसटी व्यवस्था व्यवस्थित चालत असल्यामुळे आणि बँकांच्या पुनर्भांडवलीकरणामुळे भारतात आर्थिक वाढीला बळ मिळत आहे आणि येत्या काळात यात आणखी वेग येण्याची शक्यता आहे,” असे बँकेने म्हटले आहे.

मागील आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वाढीचा दर 6.7 टक्के एवढा होता. वैयक्तिक खर्च आणि निर्यातीत झालेल्या वाढ यांमुळे 2018-19 मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर 7.3 टक्क्यांवर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment