‘गुगल प्लस’चे शटडाऊन

google
सॅन फ्रान्सिस्को – गुगलने फेसबुकला तगडा पर्याय म्हणून निर्माण केलेली गुगल प्लसची सेवा बंद करण्याची घोषणा केली असून या सोशल नेटवर्किंग साईटमधील पाच लाख लोकांच्या खासगी अकाऊंटमधील डेटा हॅक झाला होता. ही साईट बंद करण्यापूर्वी आम्ही त्यातील दोष दुरुस्त केल्याचे गुगलने म्हटले आहे.

अमेरिकेच्या या दिग्गज इंटरनेट कंपनीने म्हटले की, युजर्ससाठी गुगल+ चा सूर्यास्त झाला. ही सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकला टक्कर देण्यास असमर्थ ठरली होती. गुगल+ बंद होण्यामागे व्यवस्थापनात अनेक अडचणी होत्या हे मुख्य कारण असल्याचे गुगलच्या एका प्रवक्त्याने सांगितले आहे. यामुळे ग्राहकांच्या अपक्षेनुसार साईट तयार केली असली तरी तिचा वापर कमी झाला होता.

Leave a Comment