एअरटेलने आणला १५९ रुपयांचा धमाकेदार प्लॅन

airtel
सध्या मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार वॉर सुरु असून या कंपन्या एकमेकांमध्ये वरचढ होण्यासाठी सातत्याने नवनवीन प्लॅन जाहीर करत असतात. एअरटेलने आता रिलायन्स जिओ आणि व्होडाफोनला टक्कर देण्यासाठी नुकताच एक प्रीपेड प्लॅन जाहीर केला आहे.

ग्राहकांना १५९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि इंटरनेटच्या आकर्षक सुविधा मिळणार आहेत. ग्राहकांना यामध्ये रोज १ जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार असल्यामुळे तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. २१ दिवसांची या प्लॅनची व्हॅलिडीटी असून अनलिमिटेड कॉलिंगबरोबरच यामध्ये रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत. व्होडाफोन आणि जिओचे देखील या प्लॅनला टक्कर देणारे प्लॅन आहेत. १५९ रुपयांचा व्होडाफोनचाही प्लॅन असून जिओचा याच प्लॅनशी मिळताजुळता असलेला १४९ रुपयांचा प्लॅन आहे.

पण २८ दिवसांची व्हॅलिडीटी व्होडाफोन देत असून बाकी सुविधा सारख्याच आहेत. तर १४९ रुपयांच्या रिलायन्स जिओच्या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग आणि रोज १०० मेसेज तर मिळणार आहेतच. पण सोबत रोज १.५ जीबी डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा मिळणार आहे. एकूणच काय तर रिलायन्स जिओमुळे स्पर्धा निर्माण झाली आणि सर्वच कंपन्यांनी आपले दर घटवल्यामुळे कंपन्यांना हे काही प्रमाणात हे परवडणारे नसले तरीही ग्राहकांचा मात्र यामध्ये नक्कीच फायदा आहे.

Leave a Comment