ब्लॅकबेरी इवॉल्व उद्यापासून अमेझॉनवर मिळणार

evolve
स्मार्टफोनचा अनुभव हवा, मनोरंजन आणि रोजच्या कामांबरोबर युजरची खासगी माहिती गुप्त ठेवणारा खास फोन ब्लॅकबेरी इवॉल्व १० ऑक्टोबर पासून अमेझॉनवर उपलब्ध केला जात असल्याचे ब्लॅकबेरी फोनचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या ऑप्टीनस इन्फ्राकॉम कंपनीने जाहीर केले आहे. या फोन ऑगस्ट मध्ये लाँच केला गेला होता आणि त्याची किंमत आहे २४९९० रुपये. भारतातला हा संकल्पित, डिझाईन व निर्मित ब्लॅकबेरीचा पहिला स्मार्टफोन असल्याचे सांगितले जात आहे.

या फोनला फुल व्ह्यू डिस्प्ले, डॉल्बी साऊंड, चेहरा ओळखणे तसेच फिंग प्रिंट अनलॉक फिचर दिले गेले आहे. हा फोन युजरची प्रायव्हसी आणि सुरक्षितता राखेल. त्याला १३ + १३ एमपीचे ड्युअल रिअर कॅमेरे आणि एलइडी फ्लॅश सह १६ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. क्विक चार्ज तंत्राची ४ हजार एएमएच बॅटरी आहे. भारतीय बाजारात ब्लॅकबेरीचा हिस्सा नगण्य आहे मात्र नवा फोन भारतीय बाजारात हा हिस्सा वाढवेल असा दावा केला जात आहे.

Leave a Comment