दुर्गा मूर्ती घडविताना वापरली जाते वेश्यागृहातील माती

durga
देशभरात आता नवरात्री आणि दुर्गापूजेचा उत्सव सुरु होत असून दुर्गेच्या मूर्ती घडविणाऱ्या कारागिरांनी मूर्तींवर शेवटचा हात फिरवून मूर्ती पूजेसाठी आणि विक्रीसाठी तयार ठेवल्या आहेत. बंगाल मध्ये दुर्गापूजा हा महत्वाचा उत्सव आहे. परंपरेनुसार दुर्गेची मूर्ती बनविताना प्रथम वेश्यागृहात जाऊन तेथील माती आणली जाते आणि ती नदीकाठच्या मातीत मिसळून त्यापासून मूर्ती घडविली जाते.

या परंपरेमागे असे कारण दिले जाते, कि वेश्यागृहात पाउल टाकणारी महिला असो वा पुरुष, आत जाण्यापूर्वी सर्व पवित्रता आणि चांगुलपणा बाहेरच सोडतो त्यामुळे वेश्यागृहाच्या दरातील माती पवित्र बनते. त्यामुळे तेथून प्रथम माती मागून आणली जाते. दुसरी कथा अशीही सांगतात कि एक वेश्या दुर्गेची निस्सीम भक्त होती. तिचा समाजाकडून तिरस्कार केला जाऊ नये म्हणून दुर्गादेवीनेच तिच्या अंगणातील माती घेऊन त्यापासून मूर्ती बनवावी आणि पुजावी असा आदेश दिला आणि तेव्हापासून हि प्रथा सुरु झाली.

अन्य काही जणांच्या मते वेश्याव्यवसाय हा वाईट मानला जात असला तरी वेश्या हा समाजाचा भाग असतात आणि दुर्गा पूजा निमित्ताने तरी त्यांना थोडी मानाची वागणूक मिळावी आणि तुम्ही आमच्या समाजातील आहात असा विश्वास मिळावा म्हणून हि प्रथा सुरु झाली असावी.

Leave a Comment