येथे दरवर्षी साजरा होतो जागतिक आळशी दिवस

lazy1
आजकाल अनेक प्रकारचे खास दिवस साजरे केले जातात. मदर्स दे, फादर्स दे, महिला दिवस, तंबाखू दिवस, बाल दिवस, हृदय दिवस, नो हॉर्न डे अशी ही भलीमोठी यादी आहे. तुम्ही जागतिक आळशी दिवस बद्दल ऐकले आहे काय? नसेल तर जाणून घ्या. हा दिवस अमेरिकेतील कोलंबियाच्या इतागुई शहरात १९८५ पासून म्हणजे गेली ३३ वर्षे दरवर्षी ऑगस्ट मध्ये साजरा होतो. यंदा तो १९ ऑगस्टला साजरा झाला. विशेष म्हणजे हा दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी जगभरातून आळशी लोक येथे येतात.

lazy2
वर्ल्ड लेझीनेस डे च्या दिवशी इतागुई शहरात चक्क रस्त्यावर, झाडाखाली, बाकांवर जेथे जागा मिळेल तेथे लोक गाद्या पसरून लोळत असलेले दिसतात. हे लोक स्वतःची अंथरुणे, पांघरुणे घेऊन येतात, त्याच्याभोवती सजावट करतात आणि मस्त लोळत पडतात. यामागचे कारण असे कि जगभरात बहुतेक सर्व लोक ताण तणावाचे आयुष्य जगतात तेव्हा कोलंबियातील या शहरात राहणाऱ्या मरिओ मोन्टोया या इसमाला असे वाटले कि हे काही खरे आयुष्य नव्हे. वर्षातला किमान एक दिवस तरी पूर्ण आरामाचा हवा. त्यातून हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

lazy
अर्थात या दिवशी अनेक मजेदार स्पर्धाही भरविल्या जातात. कुणाचा पायजमा अधिक मळलेला आहे, गाडीवर सर्वात प्रथम कोण पोहोचतो अश्या या स्पर्धा असतात. जगभरातून लोक येथे येऊन जास्तीत जास्त आळशीपणा करण्यात संपूर्ण दिवस मजेत जगतात.

Leave a Comment