१५ ऑक्टोबरनंतर बंद होऊ शकतात क्रेडिट आणि डेबिट कार्ड

credit-card
नवी दिल्ली – आता १५ ऑक्टोबरनंतर रिझर्व बँकेच्या आदेशानुसार क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट करणा-यांना पेमेंट करताना समस्या येऊ शकतात. भारतीय ग्राहकांची माहिती फक्त भारतातच ठेवण्याचा आदेश रिझर्व बँकेने गुगल, व्हिसा, मास्टरकार्ड या कंपन्यांना दिला आहे.

या विदेशी कंपन्यांद्वारे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले जाते. भारत सरकारकडे या विदेशी कंपन्यांनी यासाठी मुदत मागितली आहे. १ ते २ वर्षांचा कालावधी या प्रकियेकरिता लागू शकतो, असे मत या कंपन्यांनी व्यक्त केले आहे. या व्यतिरिक्त हा माहितीचा डेटा फक्त भारतात ठेवण्यात यावा, यासाठी या कंपन्यांनी नकार दिला आहे. या माहितीची एक कॉपी भारतात ठेवली जाऊ शकते, असेही संबंधित कंपन्यांनी सांगितले आहे. परंतु रिझर्व बँक यासाठी तयार नाही.

अर्थमंत्रालयाकडे या कंपन्यांनी या प्रकरणात सवलत मागितली आहे. अर्थमंत्रालय कंपन्यांनी दिलेल्या सूचना रिझर्व बँकेसमोर ठेऊ शकते. परंतु, रिझर्व बँक यासाठी तयार झाली नाही, तर मात्र समस्या निर्माण होऊ शकते. शेवटी अंतिम निर्णय रिझर्व बँक घेणार आहे.

Leave a Comment