या पर्वतावर चढणारयांचा बनतो दगड

manimahesh
समुद्रसपाटीपासून १८५०० फुट उंच असलेला हिमाचलच्या चंबा जिल्ह्यातील रमणीय परिसर म्हणजे मणीमहेश पर्वत. बाराही महिने बर्फाच्छादित असलेला हा पर्वत शंकर पार्वतीचे निवासस्थान मानला जातो. देशात शंकराची जी पाच स्थाने कैलास म्हणून मानली जातात त्यात या पर्वताचा समावेश आहे. असे मानले जाते कि शिव पार्वती विवाहानंतर हा पर्वत शंकराने निर्माण केला. या पर्वताला नीलमणी असेही म्हटले जाते.

या पौराणिक पर्वताचे एक विशेष म्हणजे आजपर्यटन या पर्वताचे शिखर कुणीच काबीज करू शकलेला नाही. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे जो कुणी या पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करतो त्याचे शिळेत म्हणजे दगडात रुपांतर होते. असेही सांगितले जाते कि फार पूर्वी एक मेंढपाळ या पर्वतावर मेंढ्या चरायला घेऊन गेला पण मेंढ्या वर चढल्या तसे त्यांचे दगड बनले आणि मेंढपाळ वर चढत गेला तेव्हा त्याचाही दगड बनून गेला. १९६८ साली एका गिर्यारोहकाने हा पर्वत चढायचा प्रयत्न केला होता मात्र त्याला मृत्यू आला. त्यामुळे या पर्वतावर चढायचे साहस कुणी करत नाही.

chaurasi
मरु वंशाचा राजा सलील वर्मा भरमेरचा राजा होता. त्याला अपत्य नव्हते, त्याच्या राज्यात एकदा ८४ साधू आले तेव्हा राजाने त्यांचे चांगले आगतस्वागत केले, पाहुणचार केला. तेव्हा साधुनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्या घरी १० मुले आणि एक मुलगी जन्माला आली. या राजाने साधूंची आठवण म्हणून ८४ मंदिरे बांधली. ती या पर्वतापासून जवळ आहेत. हि मंदिरे अवश्य पहावी अशी आहेत. त्याने बांधलेल्या शिवमंदिराला मणीमहेश असे म्हणतात. हा मंदिर समूह तत्कालीन उच्च कला संस्कृतीचा नमुना आहे.

Leave a Comment