यंदा कॅनेडियन नायगारावर होणार दिवाळीची आतषबाजी

naygara
अमेरिका कॅनडा सीमेवर असलेल्या जगप्रसिद्ध नायगारा धबधबा यंदा प्रथमच दिवाळीत शोभेच्या दारूच्या आतषबाजीने झगमगून उठणार आहे. यंदा येथे प्रथमच दिवाळीचे फटके उडविले जाणार आहेत. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नायगारावर दिवाळीची आतषबाजी नायगरा पार्क कमिशनच्या मदतीने केली जाणार असून त्यासाठी इंडो कॅनेडीयन आर्ट्स कौन्सिल या एनजीओने खास प्रयत्न केले आहेत.

या एनजीओचे प्रमुख अजय मोदी म्हणाले या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले कि दिवाळी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाल्याने आम्ही खूप आनंदात आहोत. आम्हाला दिवाळीसाठी ऐतिहासिक आणि रमणीय स्थळच हवे होते. कॅनडाच्या बाजूचा नायगारा फारच सुंदर आहे. यंदा ७ नोव्हेंबरला दिवाळी आहे मात्र त्यावेळी येथे प्रचंड थंडी असते आणि त्यामुळे हवा खराब असू शकेल आणि सहभागी होणाऱ्यांना कार्यक्रमाचा आनंद पुरेसा लुटता येणार नाही हे लक्षात घेऊन आम्ही १४ ऑक्टोबरलाच हा कार्यक्रम करणार आहोत. यात दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि सायंकाळी आतषबाजी केली जाणार आहे.

Leave a Comment