भारतात बनणार शाओमीचे एमआय एलइडी टीव्ही

ledtv
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीने त्यांचे एमआय एलइडी टीव्ही भारतातच बनविले जाणार असल्याची घोषणा केली आहे. डिक्सन टेक्नोलॉजीच्या मदतीने हे उत्पादन केले जाणार असून त्यासाठी आंध्रप्रदेश मधील तिरुपती येथे ३२ एकर जागा घेतली गेली आहे. या कारखान्यात दरमहा १ लाख टीव्ही बनविले जाणार आहेत. कंपनी ३२, ४३, ४९ आणि ५५ इंची टीव्हीचे उत्पादन करते पैकी ३२ आणि ४३ इंची टीव्ही या प्रकल्पात बनविले जातील. यामुळे ८५० कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार आहे.

या वर्षीच्या फेब्रुवारी मध्ये शाओमीने स्मार्ट टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांनी ६ महिन्यातच ५० लाख स्मार्टटीव्ही भारतात विकले आहेत. इंटरनॅशनल डेटा कार्पोरेशनच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार शाओमी स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारात १ नंबर ब्रांड बनला आहे. शाओमीची भारतात ६ उत्पादन केंद्रे असून त्यात भारतात विकल्या जाणारया स्मार्टफोन पैकी ९५ टक्के फोन तयार होतात.

Leave a Comment