नवा नोकिया ७.१ स्मार्टफोन लाँच

nokia7
एचएमडी ग्लोबलने नवा नोकिया ७.१ स्मार्टफोन लंडन येथील कार्यक्रमात लाँच केला असून तो सध्या फक्त युके मध्ये मिळू शकणार आहे. या फोनच्या बेसिक मॉडेलची किंमत ३१९ युरो म्हणजे साधारण २८ हजार रु. आहे. या फोनसाठी अँड्राईड ८.० ओरिओ ओएस दिली गेली असून लवकरच ९.० पाय अपडेट दिले जाणार आहे. हा फोन भारतीय बाजारात कधी येणार याची माहिती मिळू शकलेली नाही.

प्युअर डिस्प्ले टेक्नोलॉजीचा हा कंपनीचा पहिलच हँडसेट असल्याचे सांगितले जात आहे. या फोनला ५.८४ इंची फुल एचडी नॉच डिस्प्ले दिला गेला आहे. ३ जीबी रॅम,३२ जीबी स्टोरेज तसेच ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज अश्या दोन व्हेरीयंट मध्ये हा फोन उपलब्ध असून त्याला ४०० जीबी पर्यंत हायब्रीड एचडी कार्ड सपोर्ट मिळणार आहे. फोनला १२ एमपी आणि ५ एमपीचे दोन रिअर कॅमेरे असून फ्रंटला एआय सह ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. ३०६० एचएएमची बॅटरी असून ती ३० मिनिटात ५४ टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment