जिओ गिगाफायबर विकासासाठी हाथवेचे अधिग्रहण होणार

giga
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानी यांनी रिलायंस इंटरनेट ब्रॉडबँड सेवा जिओ गीगाफायबरचा वेगाने विकासासाठी महत्वाचे पाउल टाकले असून जिओ हाथवे केबलचे अधिग्रहण करण्याच्या जोरदार प्रयत्नात असल्याचे मिडिया रिपोर्ट आहेत. त्यासाठी २५०० कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी जीओने केली आहे.

रिलायंस जिओने ५ कोटी घरात ब्रॉडबँड सेवा देण्याचे लक्ष्य ठेवले असून प्रतिस्पर्धी एअरटेलने ब्रॉडबँडसेवा व्ही फायबर पूर्वीच लाँच केली आहे. रिलायंसने हाथवे केबल सोबत बोलणी सुरु केली आहेत. जिओने १५ ऑगस्ट पासून गिगा फायबर कनेक्शन साठी नोंदणी सुरु केली असून या सेवेच्या माध्यमातून भारताच्या खराब ब्रॉडबँड सेवेत १३४ रँकिंगची सुधारणा करून भारताला जगातील पाच टॉप ब्रॉडबँड देशात सामील करण्याचे ठरविले आहे.

रिलायंस जीओने गिगा फायबर साठी यापूर्वीच २.५ लाख कोटी रुपयांची गुतंवणूक केली असून हे सेवा एकाचवेळी देशातील ११०० शहरात सुरु केली जाणार आहे.

Leave a Comment