लाखो पर्यटकांचे आवडते सांता मोनिका

santa
जगभरात अनेक सुंदर सुंदर पर्यटन स्थळे आहेत आणि तेथे जगभरातील पर्यटक गर्दी करत असतात. अश्या रमणीय स्थळात सांता मोनिका बेटाचा नंबर वरचा लागेल. अमेरिकेच्या वेस्ट लॉसएंजेलिस काउंटी कॅलिफोर्निया मधील हे एक समुद्र किनारी असलेले शहर. ते खाडीवर वसलेले आहे. अनेक आकर्षक दुकाने, रेस्तोरंट यांची एकच गर्दी असलेल्या या शहराचे विशेष म्हणजे येथे होणारे विविध कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम पाहायचे म्हटले तर एक आयुष्य कमी पडेल असे सांगितले जाते. या शहराचा कानोकानी वेध घ्यायचा तर ८-१० दिवसात ते शक्य होत नाही.

monika
या शहरात किमान ४० हॉटेल्स समुद्र किनाऱ्यापासून कित्येक मैल आत आहेत. जगप्रसिद्ध सांता मोनिका पियरला भेट द्यायलाच हवी असे हे ठिकाण असून लहान मोठ्या सर्व पर्यटकांसाठी येथे काही न काही आहेच. त्यात कॅरोरोल, प्लेलँड आर्केड, पॅसिफिक अम्युझमेंट सेंटर, मत्स्यालय, अवश्य अनुभवावे.

येथे बाईक भाड्याने घेऊन शहर फिरण्याची सुविधा आहे. येथील जो विल रॉजर्स बीच व टोरेंस कौंटी बीच २२ मैलाचा असून या रस्त्यावरून सैर करणे हा वेगळाच आनंदानुभव आहे.

Leave a Comment