मोबाईल चोरीला जाणे ही नित्याने घडणारी घटना म्हणावी इतक्या संख्येने मोबाईलच्या चोऱ्या होत असतात. मोबाईल चोरीला गेला कि पोलिसांकडे तक्रार नोंदविणे हे काम आलेच. पण बहुतेक हे चोरीला गेलेले मोबाईल आपल्याला परत मिळत नाहीतच. मोबाईल चोरीला गेला असे वाटले कि आपण सर्वप्रथम आपल्याच मोबाईल नंबरवर कॉल करून तो ट्रेस करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे लोकेशन मिळत नाही.
म्हणून सापडत नाहीत चोरीला गेलेले मोबाईल
या मागचे खरे कारण असते ते म्हणजे चोर किंवा हॅकर पहिले काम करतात ते मोबाईलचा इंटरनॅशनल इक्विपमेंट आयडेंटीटी नंबर म्हणजे आयएमइआय नंबर बदलतात. त्यासाठी एक खास प्रकारचे सॉफटवेअर वापरले जाते. याच्या सहाय्याने कोणत्याही स्मार्टफोनचा आयएमइआय बदलता येतो.. त्यामुळे चोरल्या गेलेल्या फोन पर्यंत पोलीस पोचू शकत नाहीत. फोन चोरला कि प्रथम फोनचे पॅटर्न अनलॉक केले जाते आणि हा नंबर फ्लॅशर, ऑक्टोपस, वोल्काने असल्या खास सॉफटवेअरच्या सहाय्याने बदलला जातो. त्यासाठी केवळ ५०० रु. खर्च येतो. त्यातही फ्लॅशर चा वापर सर्वाधिक होतो.
प्रत्यक्षात सर्व स्मार्टफोन उत्पादक कंपन्या स्मार्टफोनचा आयएमइआय नंबर बदलण्यास्ठी वेगवेगळी सॉफटवेअर वापरतात मात्र हॅकरना त्यामुळे काहीच फरक पडत नाही. फक्त आयफोनचा आयएमइआय नंबर बदलण्यासाठी हि सोफ्टवेअर काम करू शकत नाहीत असेही सांगितले जाते.