प्रसिद्ध राजकीय नेत्यांच्या अजब आवडी

modii
सेलेब्रिटीना काय आवडते, काय आवडत नाही, त्यांचे छंद कुठले, त्याच्या सवई काय याबाबत सर्वसाधारण लोकांना खूपच कुतूहल असते. कलाकारांबद्दल या बाबत खूप बोलले जाते, लिहिले जाते मात्र प्रसिद्ध राजकारणी व्यक्तींबद्दल अशी माहिती फारशी उघड केली जात नाही असेही आढळते. आपल्या भारतीय नेत्यांच्या अश्याच काही सिक्रेट बद्दलची हि मनोरंजक माहिती खास आमच्या वाचकांसाठी.

arun-j
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोज पहाटे चार वाजता न चुकता योग करतात हे आपण जाणतो. मोदी शिस्तीचे भोक्ते आहेतच पण त्यांना एक गोष्ट अजिबात खपत नाही. ती म्हणजे इस्त्री न करता कपडे घालणे त्यांना अजिबात आवडत नाही. मोदींच्या मंत्रिमंडळातील अर्थ खाते सांभाळणारे अरुण जेटली हे सहा नंबरचे भोक्ते आहेत. त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या कार्सच्या नंबर मध्ये सहा आकडा असतोच. उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू चहा कॉफी घेत नाहीत. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यापासून त्यांनी चहा कॉफी सोडली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग हे दररोज पूजा पाठ करतातच कारण त्याची देवावर नितांत श्रद्धा आहे.

sonia
राजकीय क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या आपल्या महिला नेत्या आवडी निवडीत मागे नाहीत. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना जांभळा रंग अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या घरातही या रंगाची एकही वस्तू ठेवीत नाहीत.

sushama
आपल्या फायरब्रांड भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या रोज वाराप्रमाणे ठराविक रंगाचे कपडे वापरतात. म्हणजे वेगळा वार, वेगळ्या रंगाचा कपडा.

maneka
महिला आणि कुटुंब कल्याण विभागाच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची आवड काही वेगळीच आहे. सर्वसाधारणपणे महिला म्हटले कि पर्स किंवा हँडबॅग हवीच. जणू पर्स हा महिलांच्या शरीराचाच एक भाग असतो. मनेका गांधी मात्र कधीच पर्स किंवा हँडबॅग वापरत नाहीत. त्या पैसे सुद्धा साडीच्या पदरात किंवा ओढणीत बांधून घेतात.