आवडता नवरा शोधण्यासाठी 58 हजार, नाही मिळाल्यावर 65 हजार

bride
चंडीगढमधील एका तरुणीने आपल्या पसंतीचा नवरा मिळण्यासाठी ऑनलाईन मॅरेज ब्यूरो कंपनीला 58 हजार रुपये दिले. मात्र कंपनीची सेवाच न आवडल्यामुळे तिने या ब्यूरोवर खटला दाखल केला आणि आता ग्राहक न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल दिला आहे. या ब्यूरोने तरुणीला 65 हजार रुपये द्यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

चंडीगढमध्ये सेक्टर-27 येथे राहणाऱ्या गुंजन सरीन या तरुणीने आपला जोडीदार निवडण्यासाठी सेक्टर-36डी येथील वेडिंग विश प्राईव्हेट लिमिटेड या मॅट्रिमोनियल कंपनीशी 2 जून 2016 रोजी करार केला होता. कंपनीच्या रॉयल प्लान अंतर्गत कंपनीकडे नोंदणी करण्यासाठी गुंजन हिने रजिस्ट्रेशन फीसच्या स्वरूपात के तहत युवती ने कंपनी को के रूप में 58,650 रुपये दिले.

या करारानुसार कंपनीने गुंजनच्या मनासारखा जोडीदार निवडणे भाग होते. तीन महिन्यांपर्यंत ही कंपनी गुंजनसाठी एकही उपयुक्त जोडीदार निवडू शकली नाही. तेव्हा तिने कायदेशीर नोटिस पाठवली. तरीही उत्तर न मिळाल्यामुळे तिने या कंपनीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा-1986 अंतर्गत तक्रार दाखल केली.

याचिकाकर्ता तरुणीला जोडीदारासाठी 21 प्रोफाईल दाखवण्यात आल्या, मात्र ऑगस्ट 2016 पासून तिने प्रोफाईल नाकारणे सुरू केले, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही.

या तरुणीने दिलेल्या शुल्कातून 10 टक्के कापून 52,704 रुपये गुंजनला परत द्यावेत. तसेच सेवेत कुचराई करणे आणि मनस्ताप दिल्याबद्दल सात हजार रुपये दंड आणि पाच हजार रुपये खटल्याचा खर्च द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला. तसेच ही रक्कम 30 दिवसांत दिली नाही तर त्यावर वार्षिक 12 टक्के दराने व्याज द्यावा लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Comment