मकरंद अनासपुरे करणार नानाला ‘बोलते’

nana-patekar
कलर्स मराठीवर सध्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा नवा कार्यक्रम सुरु झाला असून नाना पाटेकर यांची मुलाखत यात ४ आणि ५ ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे.

अभिनेता मकरंद अनासपुरे ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. ४ आणि ५ ऑक्टोबरला प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात अभिनेता नाना पाटेकर आणि नितीन गडकरी यांनी हजेरी लावली आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. नाना यात इंग्लिश भाषेबद्दल बोलताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे किस्से ऐकणे हे मजेशीर ठरणार आहे. सर्वात मह्त्त्वाचे म्हणजे सध्या नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या सुरू असलेला वाद खूप गाजतोय. यावर मकरंद त्यांना प्रश्न विचारणार का ? आणि त्याचे उत्तर नाना काय देणार याबद्दलची उत्सुकता लागून राहणार आहे.