नव्या आयफोनकडे भारतीय ग्राहकांची पाठ

Iphone
दिग्गज कंपनी अॅपलने गेल्या महिन्यातच आपले नवे आयफोन सादर केले. पण, भारतीय ग्राहकांनी कंपनीने लॉन्च केलेल्या iPhone XS आणि XS Max या दोन नव्या आयफोनकडे सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र आहे. या दोन्ही फोनसाठी भारतातून अत्यल्प मागणी असल्याचे समोर येत आहे. तुलनेने आयफोन XS ची मागणी बऱ्यापैकी आहे. निम्म्यापेक्षा कमी फोनची विक्री विकेंड सेलमध्ये झाली असून, एवढी कमी विक्री होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे भारतातील अनेक विक्रेत्यांनी सांगितले.

देशात जवळपास १५०० अॅपल प्रीमियम रिसेलरचे स्टोअर्स आहेत, पण नव्या आयफोनचा ४० ते ५० टक्के स्टॉक या स्टोअर्समध्ये तसाच पडून आहे. याउलट गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या आयफोन X ची मागणी अधिक आहे. आतापर्यंत आयफोन XS आणि XS मॅक्सच्या केवळ ५० ते ६० टक्के मॉडेल्सची विक्री झाली आहे. आकडेवारीचा विचार करता गेल्या वर्षी अवघ्या तीन दिवसांमध्येच आयफोन X ची विक्री ५० ते ६० टक्के झाली होती, सणासुदीचा काळ सुरू झाल्यानंतर आयफोनच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. ९९ हजार ते १ लाख ४४ हजाराच्या दरम्यान या दोन्ही नव्या आयफोनची किंमत आहे.

Leave a Comment