ड्रेसकोडचा निर्णय मागे न घेतल्यास बडवून काढू – तृप्ती देसाई

trupti-desai
कोल्हापूर – देवस्थान समितीने ड्रेसकोडचा निर्णय दहा ऑक्‍टोबरपर्यंत मागे न घेतल्यास देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांना कोल्हापुरात येऊन बडवून काढण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला.

देवस्थान समितीने दिलेला निर्णय हुकूमशाही प्रकारचा असून हा निर्णय देवस्थान समितीचे मागासलेपण दाखवणारा आहे. समितीने या निर्णयाऐवजी देवस्थानमधील गैरव्यवहार, जमिनीचे वाद, भ्रष्टाचार यांविरोधात कारवाईचे शस्त्र हाती घ्यावे. हा भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा ड्रेसकोडचा निर्णय असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

भाविकांकडून पारंपरिक पोशाखामध्ये मंदिर प्रवेशाचा नियम करावा, अशी मागणी होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. देवस्थान समितीला तशा मागणीची अनेक पत्रे आली आहेत. भाविकांच्या मताचा आदर करूनच भारतीय पोशाख परिधान करून मंदिरात येण्याचे आवाहन समितीने भाविकांना केले असल्याने हा निर्णय मागे घेण्यात येणार नाही, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले आहे.

Leave a Comment