तनुश्री दत्ता ‘Bigg Boss’मध्ये आली तर सेट तोडून टाकू

tanushree-dutta
पुणे – बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता अभिनेता नाना पाटेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आरोप केलेल्याने चर्चेत आली आहे. तसेच ती ‘बिग बॉस’च्या घरात जाणार असल्याचीही चर्चा आहे. तनुश्रीने सोमवारी नसेची तुलना थेट जहाल दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’शी (इसिस) केली आहे. मनसे कार्यकर्ते यावरून संतापले आहे. लोणावळा येथील रियलिटी शो ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांची मनसे कार्यकर्त्यांनी भेट घेतली. ‘बिग बॉस’मध्ये तनुश्री आल्यास हा शो चालू देणार नाही. सेट तोडून फेकू, मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मनसेचे लोणावळा शहराध्यक्ष अक्षय जाचक यांनी सांगितले की, राज ठाकरे यांची बदनामी तनुश्री ही पब्लिसिटी मिळविण्यासाठी करत आहे. ‘बिग बॉस’मध्ये तनुश्रीला सहभागी व्हायचे आहे. तिचे हे सगळे उद्योग त्यासाठी सुरु आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तनुश्री दत्त सुरक्षाकवच दिले आहे. तिच्या घराबाहेर २४ तास पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत. मनसेकडून तिला धमकी मिळत असल्याचा आरोपी तनुश्रीने केला आहे. सोबतच नाना पाटेकर यांनीही तिला धमकी दिल्याचे तिने पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Comment