१८१ रुपयांच्या प्लानमध्ये एअरटेल देत आहे दुप्पट डेटा

airtel
नवी दिल्ली : एअरटेल या मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी धमाकेदार ऑफर देऊ केली आहे. केवळ १८१ रुपयांत रोज ३ जीबी डेटा मिळणार असून कॉलिंगही अनलिमिटेड करण्यात आले आहे.

टेलिकॉम टॉकनुसार एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना १८१ रुपयांत प्रत्येक दिवशी ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळणार आहे. शियाव १०० एसएमएसही मोफत असणार आहे. या पॅकची व्हॅलिडीटी १४ दिवसांची असणार आहे. म्हणजेच एकूण ४२ जीबी डेटा मिळेल. यानुसार प्रती जीबी साठी केवळ ४.३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर व्हॉईस कॉलसाठी कोणतेही बंधन नाही. हे पॅक काही ठराविक सर्कलसाठी वैध राहणार आहेत. सध्या तीन जीबी एवढ्या कमी किंमतीत देणारे कोणत्याही कंपनीचे रिचार्ज नसल्यामुळे जिओच्या १९८ रुपयांच्या पॅकला टक्कर मिळणार आहे.

Leave a Comment