पंजाब नॅशनल बँकेला यंदा नफा मिळण्याची खात्री

pnb
चालू आर्थिक वर्षात पंजाब नॅशनल बँक नफा मिळवेल असा विश्वास बँकेचे प्रमुख अधिकारी सुनील मेहता यांनी व्यक्त केला असून गत वर्षात उघडकीस आलेला १४ हजार कोटींचा निरव मोदी घोटाळा आता इतिहास बनल्याचे सांगितले आहे. या वर्षाच्या जानेवारी महिन्यात निरव मोदी घोटाळ्याची व्याप्ती लक्षात आली होती त्यानंतर बँकेने अनेक उपाययोजना केल्या त्याचा फायदा होताना दिसत असल्याचे मेहता म्हणाले. केरळ पूरग्रस्त निधी साठी मुक्यामंत्री विजयन यांच्याकडे ५ कोटी रु. चेक मदत म्हणून दिला त्यावेळी ते बोलत होते.

निरव मोदी घोटाळ्यात बसलेला प्रचंड फटका बँकेने सहन करण्याची क्षमता दाखविल्याचे सांगून मेहता म्हणाले, आमच्या व्यवसायात निश्चित वाढ होते आहे आणि यंदाच्या तिमाहीत आम्ही नफा मिळवू अशी खात्री आहे. जूनचा तिमाहीत बँकेला ९६० कोटींचा तोटा झाला होता. बँकेच्या संचालक मंडळाने विस्तारासाठी केंद्र सरकारकडे ५४३१ कोटींची मागणी केली असून बँक त्यासाठी शेअर जारी करणार आहे. यामुळे बँकेतील गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल असेही ते म्हणाले.

Leave a Comment