पार्थ अजित पवार लोकसभा निवडणूक रिंगणात?

parth
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याजी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरवात केली होती. अजित पवार यांनी पार्थच्या राजकीय प्रवेशाला उघड दुजोरा दिला नसला तरी आजकालची पिढी स्वतःचे निर्णय स्वतः घेते असे सूचक वक्तव्य एक वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते.

राष्ट्रवादीची येत्या ६ व ७ ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघ विषयाबाबत बैठक होणार आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार याच बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीसंबंधी निर्णय घेतला जाईल. आजोबा शरद पवार याच्यासोबत पार्थ यांना अनेक राजकिय कार्यक्रमात यापूर्वी पहिले गेले आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशांत पार्थ यांनी नागपूर येथे जाऊन राज्य विधिमंडळाचे कामकाज पहिले होते. आदित्य ठाकरे यांनीही या अधिवेशनाला भेट दिली होती. पार्थ राजकारणात आले तर पवार कुटुंबातील हि तिसरी पिढी राजकारणात सक्रीय होणार आहे.

Leave a Comment