अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित

girish
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्त्या आणि अन्य काही मागण्यांसाठी २ ऑक्टोबर पासून उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची राळेगण सिद्धी येथे भेट घेऊन त्याच्या बहुतेक मागण्या मान्य केल्याने अण्णांनी उपोषण स्थगित केले आहे.

अण्णांनी या संदर्भात सरकारकडून काही प्रस्ताव आल्याचे सांगितले. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग याच्याकडून अण्णांना त्यांच्या मागण्या पपूर्ण केल्या जातील असे पत्र आले आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रासह गिरीश महाजन अण्णांना भेटले आहेत. अण्णांबरोबर दोन तास झालेल्या बैठकीत अण्णांच्या ९० टक्के मागण्या मान्य केल्याचे महाजन यांनी सांगितले आहे. अर्थात अण्णांनी या मागण्या पूर्ण न झाल्यास ३० जानेवारी पासून उपोषण सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment