राष्ट्रपित्याला वंदन करण्यासाठी ट्विटरकडून खास ९ हॅशटॅग

twitter
मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा देशभरात आज उत्साह आहे. गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी महात्मा गांधी यांचा जन्म झाला. त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या वाटेवर आयुष्यभर वाटचाल केली. ब्रिटीशांची सत्ता अहिंसेच्या मार्गाने उलथवून टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. संपूर्ण देश आज त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वात मोठ्या अहिंसेच्या पुजाऱ्याला विनम्र आदरांजली वाहत आहे. ट्विटरवरुन महात्मा गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदरांजली वाहिल्यानंतर राजघाटावर जाऊन मोदींनी राष्ट्रपित्याला वंदन केले.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रपित्याला वंदन करण्यासाठी ट्विटरनेही खास हॅशटॅग तयार केले आहेत. त्याचबरोबर या हॅशटॅगसोबत गांधीजींची इमोजीही दिसत आहेत. गांधी जयंतीनिमित्त तब्बल ९ हॅशटॅग गांधीजींच्या इमोजीसह ट्विटर इंडियाने केले आहेत. इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांचा यामध्ये समावेश आहे. आजपासून पूर्ण आठवडाभर हे हॅशटॅग कार्यरत राहणार आहेत. तुम्ही गांधी जयंतीनिमित्त ट्विट केल्यानंतर ट्विटरने दिलेले हॅशटॅग दिल्यास गांधीजींची इमोजी दिसेल.

असे आहेत ट्विटरचे हॅशटॅग
#GandhiJayanti
#गाँधीजयंती
#ગાંધીજયંતિ
#MahatmaGandhi
#MKGandhi
#BapuAt150
#MyGandhigiri
#NexusOfGood
#MahatmaAt150

Leave a Comment