येरवड्यात असताना गांधीजींनी केले होते तुकोबांच्या अभंगांचे भाषांतर

combo1
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जडणघडणीत मोठे स्थान आहे. महात्मा गांधी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरू मानत असत. गांधीजींना महाराष्ट्राची साहित्य, परंपरा तसेच सामाजिक चळवळीविषयी आस्था होती. महात्मा गांधींना येरवडा तुरूंगात असताना संत तुकारामांचे भावदर्शन घडले. महात्मा गांधींनी तुकारामांच्या १६ अभंगाचे भाषांतर केले.

महात्मा गांधींनी भाषांतरासाठी निवडलेले अभंग विविध विषयांवरील आहे. गांधींनी तुरुंगात असताना मराठी जाणून घेतली. त्यात जे का रंजले गांजले, हे ची दान देगा, पापाची वासना नको दावू डोळा यांसह १६ अभंगांचा समावेश आहे. गांधीजींनी कोलकात्यातील शांतिनिकेतनमध्ये तुकारामांचे चित्र रेखाटून घेतली होती.

तुकारामांच्या अभंगाचे गांधीजींनी केलेले भाषांतर
जे का रंजले गांजले
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें
तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त
ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी
दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी
तुका म्हणे सांगू किती । त्या चि भगवंताच्या मूर्ति

Know him to be a true man who takes to his bosom those who are in distress. Know that God resides in the heart of such a one. His heart is saturated with gentleness through and through. He receives as his only those who are forsaken. He bestows on his man servants and maid servants the same affection he shows to his children. Tukaram says: What need is there to describe him further? He is the very incarnation of divinity.

पापाची वासना नको दावू डोळा
पापाची वासना नको दावू डोळा । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥
निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधिर करोनी ठेवी देवा ॥२॥
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥३॥
नको मज कधी परस्त्रीसंगति । जनातुन माती उठता भली ॥४॥
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा । तू एक गोपाळा आवडसी ॥५॥

Papachi vasana nako davoo dola
O God, let me not be witness to desire for sin, better make me blind; let me not hear ill of anyone, better make me deaf; let not a sinful word escape my lips, better make me dumb; let me not lust after another’s wife, better that I disappear from this earth. Tuka says: I am tired of everything worldly, Thee alone I like, O Gopal.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ॥१॥
चालो वाटे आम्ही तुझा चि आधार । चालविसी भार सवे माझा ॥धॄ॥
बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ॥२॥
अवघे जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥४॥

Jethe jato tethe tu maajha saangaati
Wherever I go, Thou art my companion. Having taken me by the hand Thou movest me. I go alone depending solely on Thee. Thou bearest too my burdens. If I am likely to say anything foolish, Thou makest it right. Thou hast removed my bashfulness and madest me self-confident, O Lord. All the people have become my guards, relatives and bosom friends. Tuka says: I now conduct myself without any care. I have attained divine peace within and without.

हे चि दान देगा देवा
हे चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गायीन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥धृ॥
न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ॥३॥

O God, grant only this boon. I may never forget Thee; and I shall prize it dearly. I desire neither salvation nor riches nor prosperity; give me always company of the good. Tuka says: On that condition Thou mayest send me to the earth again and again.

Leave a Comment