माहिती अधिकार; गुजरात्यांनी जाहीर केली तब्बल १८ हजार कोटींची अवैध संपत्ती

wealth
नवी दिल्ली – गुजराती लोकांनी तब्बल १८ हजार कोटींची अवैध संपत्ती केंद्राने सुरु केलेल्या इन्कम डिक्लरेशन स्कीम (आयडीएस) अंतर्गत जाहीर केली असून ही रक्कम आत्तापर्यंत देशातील एकूण काळ्या पैशाच्या आकडेवारीपैकी २९ टक्के एवढी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ही बाब माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीतून समोर आली आहे.

जून आणि सप्टेंबर २०१६ या काळात नोटाबंदीमुळे काळ्यापैशाची चर्चा होण्यापूर्वी प्राप्तिकर विभागाने आडीएस योजना जाहीर केली होती. प्रॉपर्टी डीलर महेश शाह याने या योजनेला प्रतिसाद देत आपली १३,८६० कोटींची अवैध संपत्ती जाहीर केली होती. प्राप्तिकर विभागाने ही माहिती एका माहिती अधिकाराअंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीला प्रतिसाद देताना दिली.

२१ डिसेंबर २०१६ रोजी काळ्या पैशाची माहिती आरटीआय कार्यकर्ते भारतसिंह झाला यांनी मागवली होती. प्राप्तिकर विभागाने त्यानंतर दोन वर्षांनी त्यांच्या अर्जाला प्रतिसाद देताना अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या प्रॉपर्टी डीलर शाह याने १३,८६० कोटींची अवैध संपत्ती जाहीर केल्याची माहिती दिली. पण देशातील राजकारणी, पोलीस अधिकारी आणि नोकरशहा यांनी जाहीर केलेल्या संपत्तीबाबत प्राप्तिकर विभागाने मौन बाळगले आहे.

Leave a Comment