रियोच्या कोपाकबाना समुद्रकिनाऱ्यावर पार पडली ‘गे प्राईड परेड’

gay-parade
रियो – हजारोंनी संगीताच्या तालावर नाचत, गाणे गात ब्राझीलच्या रियो डी जेनेरो येथे २३ व्या ‘गे प्राईड परेड’मध्ये सहभाग घेतला. रियोच्या कोपाकबाना समुद्रकिनाऱ्यावर एलजीबीटी समुदायाचा इंद्रधनुष्य रंगाचा ध्वज उडवून ‘गे प्राईड परेड’ पार पडली.

ब्राझीलमध्ये अध्यक्ष, गव्हर्नर आणि संसदीय सदस्यांच्या निवडणुका होत आहेत. ‘गे प्राईड परेड’मध्ये या पार्श्वभूमीवर घोषणा देण्यात आल्या. जो आपल्या हक्काचे रक्षण करेल त्या लोकांनाच मतदान करा, असे यावेळी सांगण्यात आले.

उपस्थितांना एलजीबीटी नॅशनल अलायन्सचे अध्यक्ष टोनी रेइस यांनी ट्रकवर थांबून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आम्हाला अशी मुले हवी आहेत जी विविधतेचा आदर करण्यास शिकतील. ब्राझीलमध्ये पुढच्या रविवारी होणाऱ्या निवडणुकीत फॅसीझमला विरोध करण्याचे आवाहन टोनी रेईस यांनी केले.