बीएसएनल देत आहे वर्षभर अॅमेझॉन प्राईमची मोफत सुविधा

BSNL
नवी दिल्ली – ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सरकारी मालकीच्या बीएसएनएल कंपनीने खास ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार वर्षभर अॅमेझॉन प्राईम सुविधा लॅन्डलाईन आणि मोबाईल वापरणाऱ्या बीएसएनएल ग्राहकांना मोफत मिळणार आहे.

अॅमेझॉन प्राईम सुविधा बीएसएनएलच्या पोस्टपेडचा प्लॅन ३९९ रुपयांहून अधिक असणाऱ्या ग्राहकांना मोफत मिळणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम सुविधा लँडलाईनच्या पोस्टपेड ग्राहकांचा प्लॅन ७४५ रुपयांहून अधिक असणारे ग्राहक मोफत मिळवू शकणार आहेत.

ही सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला बीएसएनएलच्या संकेतस्थळावर जाऊन ‘BSNL-Amazon offer’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी टाका. मोबाईलवर ओटीपी क्रमांक येईल. हा क्रमांक टाकल्यानंतर अॅमेझॉन प्राईमची सुविधा सुरू होईल.


अनेक आंतरराष्ट्रीय वेबसीरिजसह चित्रपट प्रेक्षकांना अॅमेझॉनच्या प्राईम सेवेतून पहायला मिळतात. याशिवाय अॅमेझॉनच्या ई-कॉमर्समधून खरेदी केल्यास वस्तुंची डिलिव्हिरी लवकरत मिळते. त्याचप्रमाणे या ग्राहकांना सेलमध्येही प्राधान्याने खरेदी करण्याची संधी मिळते. या सेवेसाठी वर्षाला ९९९ रुपये भरावे लागतात.

Loading RSS Feed

Leave a Comment