एअर इंडियाच्या मालकीच्या १४ मालमत्तांच्या विक्रीसाठी निविदा जाहीर

air-india
नवी दिल्ली – कर्जबाजारी असलेल्या राष्ट्रीय नागरी उड्डान कंपनी एअर इंडियाने आपल्या मालकीच्या १४ मालमत्तांच्या विक्रीसाठी निविदा जाहीर केली. २५० कोटी रुपयांच्या संकलनाचे लक्ष्य या मालमत्तांच्या विक्रीतून आहे.

या मालमत्ता मे महिन्यात कंपनीने निवडक गुंतवणूकदारांना विकण्याचा प्रयत्न केला होता. पण कोणीही गुंतवणूकदार पुढे आला नाही. सरकारने यानंतर एअर इंडियाला पुन्हा चांगल्या स्थितीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनीला फारशा उपयुक्त नसलेल्या मालमत्तांची विक्री करण्यात येत आहे. अहवालानुसार, निविदा मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, पुणे आणि अमृतसर येथील मालमत्तांच्या लिलावासाठी मागविल्या आहेत. यामध्ये निवासास उपयुक्त जमीन, फ्लॅटसचा समावेश आहे. एक नोव्हेंबरला लिलावास सुरुवात केली जाणार आहे.

Leave a Comment