राष्ट्रपिता म. गांधीच्या बद्दल खास काही

gandhi
आज देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. गांधीजींबद्दल माहिती नाही अशी एकही व्यक्ती देशात नसेल. त्याच्याविषयी बरेच बोलले गेले आहे, लिहिले गेले आहे आणि सांगितले गेले आहे. अहिंसा आणि सत्याचा मार्ग स्वीकारून भारताला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी दिल्या गेलेल्या लढ्यात बापुजींचे योगदान फारच मोठे आहे. त्यांना या पायी अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला होता हे आपण जाणतो. मात्र गांधीजींच्या आयुष्यातील काही खास गोष्टी अजूनही फारश्या माहिती नाहीत. त्यासंदर्भातली हि माहिती.

गांधीजीचा विवाह वयाच्या १३ व्या वर्षीचा कस्तुरबा यांच्या बरोबर झाला होता आणि वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना पहिले अपत्य झाले होते. लग्नानंतर ते बॅरिस्टर होण्यासाठी लंडन ला गेले मात्र त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जी पहिली केस चालविली त्यात त्यांना अपयश आले होते.

गांधीजींच्या नावाची ५ वेळा नोबेल पुरस्कारासाठी शिफारस झाली होती मात्र त्यांना नोबेल मिळाले नव्हते. अॅपल या जगप्रसिद्ध कंपनीचा संस्थापक स्टीव जॉब्स गांधीना सन्मान देण्यासाठी त्यांच्या प्रमाणे गोल काचांचा चष्मा वापरत असे. देशात प्रत्येक मोठ्या शहरात एक रस्ता गांधी रस्ता आहे. परदेशात हि महात्मा गांधी रोड या नावाचे ६० हून अधिक रस्ते आहेत.

नथुराम गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ ला गांधीजींची हत्या केली त्यानंतर निघालेली त्यांची शवयात्रा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी शवयात्रा होती. या यात्रेत १० लाख लोक सामील झाले होते तर १५ लाख लोक रस्त्यात उभे होते.

Leave a Comment