आंध्रप्रदेशांत दरमहा १ हजार रु. बेरोजगार भत्ता

chandra
आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू सरकारने राज्यातील बेरोजगार युवकांना दरमहा १ हजार रु. बेरोजगार भत्ता सुरु केला असून त्याची सुरवात २ ऑक्टोबर पासून म्हणजे म. गांधी जयंती पासून केली जात आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री युवा नेस्तम नावाने हि योजना सुरु केली आहे. त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून हि नोंदणी वेब पोर्टल वरून करता येणार आहे.

या पोर्टलवर आत्ताच २ लाख बेरोजगार युवकांची नोंद झाली आहे. तेलगु देसमने निवडणूक प्रचार काळात त्याच्या घोषणापत्रात बेरोजगार भत्ता देण्याचे जाहीर केले होते. हि घोषणा २०१४ साली केली गेली होती मात्र आता निवडणुकीला १ वर्ष बाकी असताना तिची सुरवात केली गेली आहे. यात सुरवातीला १३ जिल्ह्यातील ४०० बेरोजगारांना एका कार्यक्रमात तशी प्रमाणपत्रे किली जाणार आहेत असे समजते.

Leave a Comment