युजर अकौंट हॅक प्रकरणी फेसबुकला १२ हजार कोटीचा दंड?

penalty
फेसबुक या लोकप्रिय सोशल मिडिया साईटवरील कमजोर सुरक्षा फीचर्स मुले ५ कोटी युजर्सची अकौंट हॅक झाल्याच्या प्रकाराबद्दल युरोपिअन युनियनने फेसबुकला १.६३ अब्ज डॉलर्स म्हणजे ११९०० कोटींचा दंड लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. या सर्व प्रकारांत फेसबुकचा अहवाल मागविला गेला होता मात्र त्यांनी यामागचे कोणतेही समाधान कारक कारण दिलेले नाही, तसेच युजर्सनाही याबाबत काहीही सांगितले नाही असेही सांगितले जात आहे.

मात्र मिळालेल्या माहितीनुसार फेसबुकने हॅकर्सनी अक्सेस टोकन चोरून युजर्सची अकौंट हॅक केली असे स्पष्ट केले आहे. अक्सेस टोकन ही एक प्रकारची डिजिटल की असते ज्याच्या मदतीने युजर नेहमी लॉग इन राहतो. म्हणजे युजरला वारंवार युजरनेम, पासवर्ड द्यावा लागत नाही. अकौंट हॅक झाल्याचे समजल्यावर ९ कोटी युजर्सची अकौंट रिसेट केली जाणार असून त्यातील ५ कोटी युजर्सचे अक्सेस टोकन रिसेट केले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment