मेडिसिनचा नोबेल पुरस्कार जेम्स एलिसन, तासुकू होंजो यांना जाहीर

nobel
नवी दिल्ली – आजपासून प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. मेडिसीनमधील नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. हा पुरस्कार यंदा अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. एलिसन आणि जपानचे वैज्ञानिक तासुकू होंजो यांना संयुक्तरित्या जाहीर झाला आहे. हा पुरस्कार या दोघांना कर्करोगावरील उपचारांच्या शोधासाठी देण्यात येणार आहे. कर्करोगावर उपचारांसाठी अशी थेरपी या दोघांनी शोधून काढली ज्याद्वारे कर्करोगाच्या ट्यूमरशी लढण्याची शरीरातील पेशींची प्रतिकार शक्ती वाढवता येऊ शकते.

विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा आजपासून आठवडाभर होणार आहे. फिजीओलॉजी किंवा मेडिसीन या क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा आजच्या पहिल्या दिवशी झाली. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या निवड समितीने घेतला आहे. गेल्या ७० वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.

Leave a Comment