आयडीया १४९ रुपयांमध्ये देणार ३३ जीबी डेटा

Idea
आयडियाने रिलायन्स जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी एक नवीन प्लॅन आणला आहे. दिवसेंदिवस इंटरनेटचे दर कमी होत असताना आपला स्पर्धेत टिकाव लागावा यासाठी कंपन्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्राहकांना २८ दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनमध्ये रोज २५० मिनिटे आणि आठवड्याला १००० मिनिटे मोफत कॉलिंग करता येणार आहे. तसेच तब्बल ३३ जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबरच रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत.

हा प्लॅन सध्या केवळ कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लागू होणार आहे. त्यानंतर तो देशाच्या इतर भागातही लागू करण्यात येईल. प्रीपेड ग्राहकांसाठी हा प्लॅन लाँच करण्यात आला असून त्यांना अतिशय स्वस्तात इंटरनेट मिळणार आहे. वोडाफोन आणि आयडिया नुकतेच एकत्र झाले असून ६ कॉम्बो पॅक या दोन्ही कंपन्यांनी मिळून लाँच केले होते. कंपनीने हा प्लॅन जिओच्या १४९ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी आणला आहे.

Leave a Comment