खोदकाम सुरु असता सापडले चांदीच्या मोहोरांनी भरलेले हंडे !

coin
स्पेनमधील टोमारेस शहरातील एक पार्क मध्ये जमीन खोदण्याचे काम सुरु होते. एक मोठी पाईपलाईन या पार्कच्या जमिनीखालून जायची असल्याने हे खोदकाम सुरु होते. जमीन खोदणाऱ्या मजुरांना अचानक या ठिकाणी असे काही आढळले की ते पाहून आधी ते मजूर चक्रावले, आणि आपल्यासमोर काय आहे हे लक्षात येताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या मजुरांना खोदकाम करीत असताना अचानक मोठे घबाड हाती लागले. ही घटना काही महिन्यांपूर्वी स्पेनमध्ये घडली.
coin1
खोदकाम सुरु असताना या मजुरांना जमिनीखाली एकोणीस मोठमोठे मातीचे घडे आढळले. या सर्व घड्यांमध्ये चांदीच्या मोहोरा अगदी शिगोशिग भरल्या होत्या. या मोहोरा १६०० वर्षांपूर्वीच्या असल्याचे समजते. त्या काळच्या रोमन साम्राज्यामध्ये या मोहोरा तत्कालीन चलन म्हणून वापरल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चांदीच्या मोहोरांचे मूल्य कोट्यवधी डॉलर्सइतके असल्याचे समजते. या एकोणीस घड्यांपैकी दहा घडे आजही उत्तम परिस्थितीमध्ये असून, बाकी घडे काहीसे मोडलेले आहेत. या घड्यांमध्ये चांदीच्या मोहोरांसोबतच तांब्याची नाणी देखील सापडली आहेत.
coin2
सर्व नाणी मिळून त्यांचे एकूण वजन सहाशे किलोंपेक्षाही अधिक असल्याचे समजते. सेविया पुरातत्व संग्रहालयातील तज्ञांच्या मते या मोहोरांवर रोमन साम्राज्याची राजचिन्हे रेखित आहेत, तसेच कॉन्स्टान्टीन आणि मॅक्सिमियान यांची मुखचित्रे ही या नाण्यांवर आढळली आहेत. अश्या प्रकारची नाणी स्पेनमधील नसून, तत्कालीन रोमन साम्राज्यातील आहेत. त्याकाळी युरोपातील बहुतेक प्रांतांवर रोमनांचे अधिपत्य असल्याची माहिती तज्ञ देतात.

Loading RSS Feed

Leave a Comment