भारतात तब्बल ३१ टक्के नागरिक शुद्ध शाहाकारी

veg
आपल्या शरीरावर आपण जे काही खातो त्याचा परिणाम होत असतो. आपण निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी पौष्टिक आणि ताजे पदार्थ खाण्याला प्रथम प्राधान्य देतो. मग ते मांसाहार असो किंवा शाकाहार. पण, खाण्या-पिण्याच्या पद्धती जगभरात बदलत आहेत. त्यात जास्तीत जास्त लोकांचा कल हा मांसाहारीपेक्षा शाकाहारी जेवणाकडे अधिक असल्याचे पहायला मिळते.

शाकाहाराचा प्रसार गेल्या काही काळामध्ये जगभरात होत आहे. अमेरिकेत लोकांच्या व्हेज – नॉन व्हेज खाण्यावर अभ्यास करण्यात आला. २०१८ च्या फूड ट्रेंडबद्दल येथील एका रेस्टॉरंटच्या अहवालात सांगण्यात आले आहे. यात बहुतांश तरुण पिढीच्या आवडत्या आणि ना आवडत्या पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. त्यातून आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. याबाबत नेस्लेच्या अधिकृत वक्तव्यानुसार तरुण पिढी ही १९८० नंतर वेगाने शाकाहाराच्या दिशेने वळत असल्यामुळे ९४ टक्के वाढ हेल्दी व्हेजिटेरीयन फूडच्या मागणीत झाली आहे.

डेटा रिलीज करणारी एक संस्था ग्रब हब यांच्या अहवालानुसार, २०१६ च्या पहिल्या सहामाहीपेक्षा २०१७ च्या पहिल्या सहामाहीमध्ये पूर्ण शाकाहारी उत्पादनांच्या मागणीत १९ टक्के वाढ झालेली दिसते. अमेरिकेत गेल्या ३ वर्षात अधिकतर वेळा शाकाहारी उत्पादनांविषयी सर्च करण्यात आले आहे. वर्ष २०१४ मध्ये १ टक्के ग्राहक वेगन (शाकाहारी) असल्याचे कबूल करत होते. २०१७ मध्ये हा आकडा ६ टक्क्यांवर पोहचला आहे. शाकाहारी खाद्याच्या मागणीत यूकेमध्ये या एका दशकात ३५० टक्के वाढ झाल्याचे पाहण्यात आले आहे.

कॅनडा सरकारने जारी केलेल्या फूड गाईड २०१७ नुसार, शाकाहारी खाद्यांना अधिक प्राधान्य देण्याचे म्हटले आहे. ५० टक्के मीट कंजम्प्शनची गोष्ट चीनी सरकारच्या नव्या डायटरी गाईडलाइनमध्येही सांगण्यात आलेली आहे. चीनच्या वेगन (शाकाहारी) मार्केटमध्ये वर्ष २०१५ ते २०२० दरम्यान १७ टक्के वाढ होणार आहे. हाँगकाँगमध्ये जवळपास २२ टक्के लोकसंख्या ही शाकाहाराला प्राधान्य देतात.

जगातील ३७.५ कोटी लोकसंख्या शाकाहारी असून डेअरीच्या संबंधित उत्पादनांवर काम करणाऱ्या वैश्विक संस्थेनुसार, हल्लीच्या वर्षात दुधाची मागणी ही तेजीने वाढत आहे. वर्ष २०१८ मध्ये याची उलाढाल ११६० अब्ज रुपये इतकी आहे. वर्ष २०१० मध्ये तीच उलाढाला ४३० अब्ज रुपये इतकी होती. ऑनलाइन ग्रॉसरी उपलब्धतेमध्येही २२२ टक्के वाढ झालेली आहे.

३८ हजार ज्येष्ठ नागरिकांवर ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीद्वारे एक संशोधन करण्यात आले. यातून असे समोर आले की, मांसाहार करणाऱ्याच्या तुलनेत शाकाहारी लोकांमध्ये बॉडी मास इंडेक्स खूपच कमी आहे. एक संशोधन करून नुकतेच अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकलने अहवाल प्रकाशित केला. १० हजार ओवरवेट शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींना आपले वजन कमी करण्यास या संशोधनात सांगण्यात आले. त्यात शाकाहारी व्यक्तींनी कमी वेळात आपले वजन घटवून दाखवले. त्यातूलनेत मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना वजन घटवण्यासाठी अधिक कालावधी लागला.

७० हजार वयस्कर लोकांवर लोमा लिंडा यूनिव्हर्सिटीने संशोधन केले. ५० वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांनी त्यात सलग ६ वर्ष शाकाहार केला, त्यांच्या मृत्यूचा आकडा हा मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत १२ टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे समोर आले. तसेच शाकाहारी लोकांच्या तुलनेत मांसाहार करणाऱ्यांमध्ये अल्जायमरदेखील ३ पटीने जास्त आढळला आहे.

भारतात ३१ टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे. भारतामध्ये शाकाहारी लोकांमध्ये दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच काही ठराविक दिवसांमध्ये शाकाहारच करणारेही मोठ्या प्रमाणात आहेत. युरोपमधील जवळपास १० टक्के लोक शाकाहारी आहेत. त्यांनी कधीही मांसाहार केला नाही. इस्रायल- हा चिमुकला देश असला तरी त्याच्या ८० लाख लोकसंख्येपैकी २ लाख लोक शाकाहारी आहेत. युनायटेड किंग्डममध्ये साधारणतः १५ ते २० टक्के लोक शाकाहारी असल्याचे अहवाल सांगतो. तैवानमध्ये १० टक्के लोकसंख्या शाकाहारी असून, सरकारही शाकाहाराला प्रोत्साहन देते.

जमैकामध्ये जेवणामध्ये भात, फळे आणि भाज्यांचा समावेश सर्वाधिक असतो. तेथे सध्या शाकाहारी लोकांचे प्रमाण वाढत आहे. रास्ताफारी नावाच्या चळवळीमुळे ८ ते १० टक्के लोकसंख्या शाकाहारी बनली आहे. मांस खाणे सोडून देण्याचे प्रमाण जर्मनीमध्ये वाढत असून ७० लाख लोक शाकाहारी आहेत असे एक अहवाल सांगतो. स्वीर्त्झलँड या देशात ३ टक्के लोकसंख्य़ा शाकाहारी असून येथे भाज्या आणि दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अमेरिकेत ७ टक्के लोक शाकाहार करतात.

ऑक्सफर्ड मार्टिन स्कूल फ्यूचर ऑफ फूड प्रोग्राममध्ये एक रिसर्चर मार्को स्प्रिंगमॅननुसार, खाद्य सामग्रीच्या संबंधीत जोडले गेलेल्या उत्सर्जनात ६० टक्क्यांनी घट झाली आहे. हे रेड मीटमुळे होईल. कारण, रेड मीट मिथेन गॅस उत्सर्जित करणाऱ्या जनावरांपासून मिळते. त्यामुळे जर तुम्ही मांसाहाराचे सेवन करत असाल तर, भविष्यात होणाऱ्या नुकसानासाठी तयार रहा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही