नेदरलँड्सच्या अॅपल गावात सॅमसंगने मोफत वाटले एस ९ फोन

sams9
स्मार्टफोन कंपन्यात नेहमीच एकमेकारवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न होतात. त्यासाठी वेगवेगळे मार्ग चोखाळले जातात. आयफोनची ३ नवी मॉडेल बाजारात आल्यावर प्रतिस्पर्धी सॅमसंगने त्यांचे नवे एस ९ स्मार्टफोन नेदरलंड मधील एका गावात मोफत वाटले असून या गावाचे नाव आहे अपेल. या डच शब्दाचा अर्थ आहे अॅपल. या गावाची लोकसंख्या अवघी ३३४ असून त्यातील ५० जणांना हा मोफत फोनचा तोहफा मिळाला आहे.

सॅमसंगने हे फोन वाटप करताना अॅपलच्या उत्पादनाचा मनापासून चाहता असलेल्या मनोक या १८ वर्षीय युवकाची मदत घेतली हे विशेष. सॅमसंगचा एस ९ हा फोन ५७९०० रु. बाजारात मिळतो. असे ५० फोन मोफत वाटले गेले. यापूर्वी सिंगापूर मध्ये अॅपलच्या फोन साठी लागलेल्या रांगेत हुवाई या कंपनीने मोफत पॉवर बँक वाटल्या होत्या कारण अॅपलची कमी लाईफ बॅटरी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. हुवैल्ने पॉवर बँक मोफत वाटताना अॅपल ग्राहकांना तुम्हाला याची गरज पडणार आहे असे सांगून वाटल्या होत्या.

Leave a Comment