अॅपल आयफोन एक्स मॅक्स मागे कमावतेय १७५ टक्के फायदा

xsmax
अॅपलने नुकत्याच बाजारात आणलेल्या आयफोन एक्स सिरीजमधील फोन विक्रीत कंपनी प्रत्येक युनिट विक्रीतून तब्बल १७५ टक्के नफा कमावत असल्याचे कॅनेडियन रिसर्च फर्म टेक इनसाईटने जगासमोर आणले आहे. या फर्मच्या पाहणीत असे दिसून आले कि अॅपलला हे फोन तयार करण्यासाठी त्यातील सुटे भाग, टेस्टिंग, असेम्ब्लिंगसह आलेला खर्च आणि त्याची ज्या किमतीला विक्री होते तो आकडा यातून कंपनी चांगलाच नफा कमावत आहे. एक्स एस मॅक्स अमेरिकेत ८९९२८ तर भारतात १.२४,९०० रुपयांना विकला जात असून या फोनसाठी आलेला उत्पादन खर्च ४४३ डॉलर्स म्हणजे ३२६१६ रुपये आहे. आयफोन एक्स मॉडेलच्या ६४ जीबी व्हर्जन साठी उत्पादन खर्च २८५०८ रुपये आहे.

भारतात या फोनचे ६४ जीबीचे मॉडेल १,०९,९००, २५६ जीबीचे मॉडेल १,२४,९०० तर ५१६ जीबीचे मॉडेल १,४४,९०० रुपये मोजून घ्यावे लागणार आहे. २८ सप्टेंबरपासून हे फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत आणि विशेष म्हणजे या फोनसाठी ७० टक्के प्रीबुकिंग झाले आहे.

Leave a Comment